Posts

Showing posts from August, 2020

🔆या वर्षीची आमची राखी पौर्णिमा🔆

Image
नमस्कार! दर वर्षी राखी विक्री व राखी पोर्णिमेचा सण गुरुकुलमध्ये उत्साहात साजरा केला जातो. या वर्षी मात्र हा सण सगळ्यांनी घरी राहूनच आपल्या कुटुंबियांसोबत साजरा केला. आठवी गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी घरातल्या वस्तूंपासून वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण राख्या बनवल्या. मुलींसोबत मुलांनीही सुंदर राख्या बनवल्या. त्यासोबतच निगडी पोलीस आयुक्तांना कृतज्ञता पत्र लिहिले. सध्याच्या काळात पोलीस दलाचे जे काम चालू आहे त्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली व काळजी घ्या असा भावपूर्ण संदेश ही पाठवला. सोबत मुलांनी बनवलेल्या राख्या व भेटवस्तूही दिल्या. या वर्षी करोना काळामध्ये जे काम करत आहेत अश्या योध्यांना म्हणजेच आपल्या घरी येणाऱ्या स्वच्छता कर्मचारी किंवा काम करणाऱ्या काकू, मावश्यांना राखी, खाऊ व भेटवस्तू देऊया असे ठरले. प्रत्येकाने आपापल्या परीने राखी पौर्णिमा वेगळ्या प्रकारे साजरी करायचा प्रयत्न केला. मृणालने आपल्या घरी कचरा घेऊन जाणाऱ्या काकांना राखी व भेटवस्तू दिली. मधूश्रीने तिच्या मागच्या वर्षी  केलेल्या राखीविक्रीचे पैसे इस्त्री करणाऱ्या काकांना दिले. खूप गरज असतांना मिळालेल्या या मदतीमुळे त्या...